Campus Drive



राजुरच्या ॲड. एम.एन.देशमुख महाविद्यालयात " कॅम्पस ड्राईव्ह " चे आयोजन राजूर: राजूर येथील ॲड. एम. एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे मंगळवार दिनांक २२/८/२०२३ रोजी सकाळी ९ वा. औरंगाबाद येथील Synise technologies Ltd. या कंपनी च्या Company Trainee या पदाकरीता Campus Drive चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पदवीधर विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच आय.टी.आय. झालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या Campus Drive मधून मुलाखतीद्वारे १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.अशी माहिती प्राचार्य प्रोफेसर डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे. मुलाखतीसाठी येताना आपला अर्ज, आधार कार्ड, तसेच इतर सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे बरोबर आणावीत.प्रत्यक्ष उपस्थित राहतील त्यांचीच प्राधान्यक्रमानुसार निवड करण्यात येईल.अशी माहिती प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.रोहीत मुठे यांनी दिली आहे. मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांना लगेच कामावर रुजू होण्याची संधी आहे. त्यामुळे या संधीचा परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड.मनोहरराव देशमुख व सचिव श्री टी.एन.कानवडे यांनी केले आहे. तरी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी केलेल्या तसेच नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिनी, विद्यार्थी तसेच ITI झालेल्या विद्यार्थ्यांनी सदर दिवशी वेळेवर उपस्थित राहावे. तरी आजच खालील गुगल लिंक वर आजच https://forms.gle/19Ui6jxngaQkWeqEA या गुगल लिंक वर आपली माहिती भरून नोंदणी करावी.तसेच अधिक माहितीसाठी १) प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख. ( ८७६६५७३००७) आणि २) प्रा. रोहित मुठे. (७५८८५१४९४३) यांचेशी संपर्क साधावा.